Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याBacchu Kadu : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, कारण...

Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, कारण…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडला आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना मंत्रिपद मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बच्चू कडू यांनी वारंवार आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. पण अजित पवार भाजपसोबत जात सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासून बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता बच्चू कडू यांनीच आपण मंत्रिपदावरचा दावा सोडत असल्याचंं म्हटलं आहे.

बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘सध्या 40-50 आमदार आहेत आणि मंत्रिपद कमी आहेत. यामध्ये सर्वांनाच मंत्रिपद पाहिजे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण कमी व्हावी यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडतो. मुख्यमंत्री अडचणीत आहेत. मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मला मंत्रालय दिलंय. त्यामुळं मी मंत्रिपदाचा दावा सोडलाय. आम्हाला तुम्ही मंत्रिमंडळात हवे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पण मी त्यांना माझ्याऐवजी आमचे आमदार राजकुमार पटेल यांना मंत्रिपदाची संधी द्या असे सांगितले आहे.’, असं बच्चू कडू यांनी सांगितले.

Kirit Somaiya : आक्षेपार्ह Video वर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही गोष्टींचा अतिरेक केला की परिणाम भोगावा लागतो. तो व्हीडिओ मी पाहिलेला नाही. कुणाच्या वैयक्तिक जीवनात घुसू नये, असं मला वाटतं. पण जसं तुम्ही समोर जाता. लोकांसोबत बोलता तसंच पुन्हा तुमच्या सोबत होतं. सध्या राजकारणात द्वेषाने राजकारण केलं जातंय. पण तसं होता कामा नये, असं बच्चू कडू म्हणालेत.

ठाकरे गटाच्या खेळीने नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि बजोरिया अडचणीत

- Advertisment -

ताज्या बातम्या