Sunday, October 6, 2024
HomeराजकीयBacchu Kadu : बच्चू कडूंना मोठा धक्का! एकुलता एक आमदार धनुष्यबाण हाती...

Bacchu Kadu : बच्चू कडूंना मोठा धक्का! एकुलता एक आमदार धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत

मुंबई । Mumbai

छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्यासह तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बच्चू कडूंनी परिवर्तन महाशक्ती नावानं तिसरी आघाडी तयार केलेली असताना त्यांच्याच एकुलता एक पक्षाचा आमदार वेगळ्या विचारात आहे.

- Advertisement -

मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी बॅटला रामराम करत हातात धनुष्यबाण घेण्याचे संकेत दिले आहेत. राजकुमार पटेल यांच्या बैठकीचं एक पोस्टर व्हायरल होतं आहे त्यामध्ये बच्चू कडू यांचा फोटो आणि पक्षाचं नाव देखील दिसत नसल्यानं येत्या काळात बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान आगामी विधानसभेसाठी पटेल यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द दिला आहे. यंदाची विधानसभा प्रहार संघटनेकडून न लढता शिवसेनेकडून लढण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. त्यामुळे राजकुमार पटेल हे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा संपूर्ण अमरावती जिल्ह्यात रंगल्या आहेत.

आमदार राजकुमार पटेल यांच्या पक्षांतराच्या चर्चेबद्दल बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, आपापला राजकीय स्वार्थ असेल, त्यानिमित्ताने ते गेले असेल. त्याची आम्हाला काही परवा नाही, त्यांनी आहे तिथे सुखाने राहावं. पण, आम्ही शिंदे साहेबांनी जो एक घाव केला आहे, त्याच्यावर आम्ही हजारो घाव देऊ. त्यांनी एक खेळी खेळली आम्ही खेळी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू, असा इशारा बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना दिला आहे. आम्ही राजकुमारजींसोबत मैत्री कायम ठेवून आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. कसं आहे की, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून त्यांचं ऋण आमच्यावर होतं. आम्ही ते डोक्यात ठेवू. पण, त्यांनी खेळलेली खेळी त्यांना घातक ठरेल, असे बच्चू कडू म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटनेचे दोन आमदार निवडणून आले होते. यामध्ये एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे राजकुमार पटेल निवडून आले आहेत. आता मात्र राजकुमार पटेल हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या आधी तिसरी आघाडी बनवली असली तरी पक्षातील आमदाराने बच्चू कडू यांची साथ सोडली आहे.

मागील निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला पाठिंबा देत ते महाविकास आघाडीत सहभागी झाले. आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. त्यानंतर शिंदे गटाला समर्थन देत त्यांनी महायुती सरकारमध्ये सुद्धा सहभाग घेतला. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू नाराज होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी निर्माण केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या