Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्याBachchu Kadu : शिंदे-फडणवीसांचा मला फोन आला गुवाहाटीला येता का? मी म्हणालो...

Bachchu Kadu : शिंदे-फडणवीसांचा मला फोन आला गुवाहाटीला येता का? मी म्हणालो येतो पण…; बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

धुळे | Dhule

- Advertisement -

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यावेळी शिंदेंना या बंडासाठी शिवसेनेच्या ४० आमदारांची साथ मिळाली होती. त्याबरोबरच इतर १० अपक्ष आमदारांनी देखील एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांचा देखील सहभाग होता. बच्चू कडू हे अधूनमधून गुवाहाटीला (Guwahati) गेलो, याची खंत आपल्या भाषणामधून किंवा इतर कार्यक्रमात बोलून दाखवतात.

Pankaja Munde : …अन् पंकजा मुंडेंनी
शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यात फिरवली भाकरी

अशातच आता त्यांनी पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) चिमटा काढला आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ या कार्यक्रमाचे धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजन करण्यात आले होते. यावेळी धुळे (Dhule) जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना (Disabled Brother) विविध योजनांचा लाभ देण्यात आला. याप्रसंगी बोलतांना बच्चू कडूंनी राज्यातील सत्तांतर आणि गुवाहाटी दौऱ्याच्या आठवणी सांगत तुफान फटकेबाजी केली.

Maratha Reservation : …तर देशभरात आंदोलन करू; ओबीसी महासंघाचा राज्य सरकारला इशारा

यावेळी बोलतांना कडू म्हणाले की, महाराष्ट्र (Maharashtra) हा शिवरायांचा आहे. विधानसभेत मी दिव्यांगाशिवाय काहाही बोलत नाही. प्रामाणिकपणे काम करत आहे. दिव्यांग मंत्रालय देशातील पहिले मंत्रालय आहे. मी जेव्हा सुरत-गुवाहाटी गेलो तेव्हा बदनाम झालो. मी अडीच वर्षे मंत्री होतो. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना म्हणत होतो, दिव्यांग मंत्रालय करून टाका बच्चू कडू तुमचा गुलाम राहिल, पण ते झाले नाही. या सगळ्या घडामोडीत मला देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचा फोन आला. गुवाहाटीला येता का? तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, मी येतो पण दिव्यांग मंत्रालय झाले पाहिजे, ते त्यांनी मान्य केले,” असे सांगत बच्चू कडूंनी ठाकरेंनी आपली अडीच वर्ष निराशा केल्याचे सांगितले.

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

पुढे बोलतांना ते म्हणाले की, या गुवाहाटीच्या दौऱ्यावरून आम्ही बदनाम झालो. पण बदनामीच्या मोबदल्यात दिव्यांग मंत्रालय भेटले. मंत्रालय झाले म्हणजे सर्वकाही नाही. प्रत्येक जिल्ह्यात जावून दिव्यांगाला भेटण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही आमदार बच्चू क़डू यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार

- Advertisment -

ताज्या बातम्या