Monday, June 17, 2024
Homeजळगावचाळीसगाव : खराब रस्त्यांमुळे कंबर, पाठ, माण दुखीचेे त्रास वाढले

चाळीसगाव : खराब रस्त्यांमुळे कंबर, पाठ, माण दुखीचेे त्रास वाढले

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीसगाव शहरातील सर्वात वर्दळीच्या असणार्‍या (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड, खरजई रोड व शहरातील इतर रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळेे अतिशय दयनीय झाली आहे. खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना कंबर, पाठ व माण दुखीची आजार मोठ्या प्रमाणात जडले आहेत. तर वाहने देखील खुळखुळी होत आहेत. त्यामुळे नागरिकांना शारीरीक , मानसिक व आर्थिक त्रास सहन करावे लागत आहे. शहरात सुरु असलेल्या पाणी पुरवाठ व भुयारी गटारी योजनेमुळे अजुन किती दिवसा रस्ता दुरुस्तीसाठी वाट पाहवी लागणार आहे ?. या विषयावर सद्यातरी मागील सत्ताधारी व विरोधक गप्प बसले आहेत. ते आता न.पा.च्या निवडणुकाची (Election) वाट पाहत असून येणार्‍या निवडणुकांमध्ये रस्त्याच्या प्रश्‍नावर एकमेकांची पोलखोल करणार आहेत. परंतू आता नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

चाळीसगाव शहरातील महत्वाचा असलेला स्टेशनरोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील ४० वर्ष जुनी गटार ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठा तलाव साचत होता. यामुळे वाहन धारकांचे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सदरील गटारींतील घाण-कचरा काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक ऑफ बडोदा पर्यंतचा रस्ता तातपुरता दुरुस्त करण्यात आला होता. परंतू या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी बाहेर येत आहे. हा रस्ता वाहनधारकांना वाहन चालविण्यासाठी योग्य राहिलेला नाही. तर शहरातील खरजई रस्ता, हिरापूर रस्ता (नाक्यापर्यंत), व इतर रस्त्यांची देखील तिच अवस्था आहे. त्यामुळे वाहनधारक व पादचार्‍यांना जीव मुठीत घेवून रस्त्यावरुन चालावे लागत आहे.

खराब रस्त्यामुळे नागरिकांना गेल्या दोन वर्षात जेष्ठ नागरिक व विशेषता; तरुणांईला कबर, मान व पाठदुखीचे आजार जडले आहेत. तर वाहन देखील मोठ्या प्रमाणात नादुस्त होवून खुळखुळी होत आहेत. खराब रस्त्यांमुळे चाळीसगावकरांची शारीक, मानसीक व आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून चाळीसगाव नगरपरिषदेत भाजपाची सत्ता होती. तर मागील ४० वर्ष शहवि आघाडीची सत्ता होती. चाळीसगाव नगरपरिषदे सत्ता परिवर्तन झाल्यानतंर शहरातील रस्ते मोठ्या शहराप्रमाणे सुंन्दर होतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतू नागरिकांची अपेक्षा फौल ठरली आहेत.

यामागील अनेक कारणे आहेत, येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत एक-एक गुपीत नागरिकांपुढे उघड होणारच आहे. रस्ते दुरुस्त न होण्यामागचे सर्वात मोठे कारण हे पाणी पुरवठा व भुयारी गटार योजन असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता किती दिवस या योजनांचे कारण देत नागरिकांंना रस्तांचा त्रास सहन करावा लागणार आहे. मावळत्या सत्ताधार्‍यांनी आम्ही तातडीने रस्ते दुरुस्त करु असे आश्‍वसन दिले होत. परंतू ते पूर्ण झालेले नाही. रस्ताचा जितका त्रास नागरिकांना सद्या होत आहे. त्यांच्या दुपट्टीने त्रास येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत मागील सत्ताधारी व विरोधकाना होणार आहे, यात तिलमात्र शंका नाही. आता न.पा.वर प्रशासक बसले आहे. त्यांनी तरी त्वरित शहरातील रस्ते दुरुस्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहराच्या विकासासाठी व नागरी सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधीना जनता निवडुन देते. पाच वर्षात शहरातील रस्त्यांच्या व इतर समस्या मार्गी न लागल्यामुळे माजी नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी मतदारांशी गद्दारी केली आहे. येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत नागरिक त्यांना धडा शिकवतीलच. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता न.पा.प्रशासनाने शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त कराव अशी अपेक्षा आहे.

-प्रा.गौतम निकम, जनआंदोलन खान्देश विभाग

पूर्वी साठ वर्षांनतंर कंबरात, पाठीत व माणमध्ये गॅप पडण्याचे प्रकार रुग्णांमध्ये दिसायचे. परंतू आता कमी वयातील लोकांंना सुध्दा कंबर, माण व पाठ दुखींच्या त्रास होत आहेत. गेल्या पाच वर्षात चाळीसगावात कंबर, माण व पाठ दुखींच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. विशेषता; तरुणामध्ये हे प्रमाण मोठ्या प्राणात दिसून येत आहे. या मागचे मुळे सर्वसधारण कारणांमध्ये खराब रस्ते म्हणता येईल, कारण आज प्रत्येकाकडे दुचाकी व इतर वाहने आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना खराब रस्त्यांचा प्रचंड त्रास होत आहे.

– डॉ.सुनील राजपूत,अस्थीरोग तज्ञ, चाळीसगाव

गेल्या पाच वर्षात दुचाकी वाहनांच्या दुरुस्तीचे प्रमाणे आमच्याकडे वाढले आहे. खराब रस्त्यांमुळे दुचाकीच्या बेअरिंग, शॉकऍप, सिंटेरिंग, पंच्चर, टायर फुटणे, रिंग ऑऊट आदिचे प्रमाण मोठ्या प्राणात वाढले आहे. दुचाकी दुरुस्त केल्यानतंर देखील ग्राहक दुसर्‍या दिवशी पुन्हा आमच्याकडे वाहन दुरुस्तीसाठी येतो. खराब रस्त्यामुळेे दुचाकी पुन्हा-पुन्हा नादुरुस्त होते. खड्यामुळेे दुचाकीचा खुळखुळा होत आहे. यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच नव्या वाहनाचा देखील मेन्टेन्सचा खर्च करावा लागत आहे.

– विजय (पप्पू) पाटील, जगंदबा ऍटो,चाळीसगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या