Wednesday, October 16, 2024
Homeनगरवादळी वार्‍यासह अवकाळीचा तडाखा; एक व्यक्ती, 13 जनावरे मृत्यूमुखी

वादळी वार्‍यासह अवकाळीचा तडाखा; एक व्यक्ती, 13 जनावरे मृत्यूमुखी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शुक्रवारी जिल्ह्याच्या विविध भागात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे एका व्यक्तीसह 13 लहान-मोठे जनावरे आणि 31 घरांची पडझड झाली आहे. यासह अनेक तालुक्यात शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याठिकाणी पंचनामे सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात शुक्रवारी कर्जत, कोपरगाव, पारनेर, नगर शहर, अकोले या तालुक्यात जोरदार अवकाळीसह अन्य तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. वादळात वीज कोसळून अकोले तालुक्यातील एक व्यक्ती मयत झाला. संगमनेर तालुक्यात 2, कर्जत तालुक्यात 2, जामखेड तालुक्यात 1 आणि पारनेर तालुक्यात 8 शेळ्या अशा लहान-मोठ्या 13 जनावरांचा वीज कोसळून मृत्यू झाला. कर्जतमध्ये 21, कोपरगावमध्ये 7 आणि पारनेर तालुक्यात 3 अशा 31 घरांची पडझड झालेली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक पावसाची नोंद ही कर्जतच्या भांबोरामध्ये 45 मि.मी., कोपरगाव 26 मि.मी. संगमनेर तालुक्यातील डोळसणे आणि घारगाव प्रत्येकी 21 मि.मी., अकोले तालुक्यातील साकीरवाडी 18, राजूर 18, शेंडी 18 मि.मी., कोतुळ 18 मि.मी. आणि ब्राम्हणवाडा या महसूल मंडळात 15 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या अवकाळीमुळे जिल्ह्यात काही तालुक्यात शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झालेले असून त्याठिकाणी पंचनामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

श्रीगोंद्यात वादळी पाऊस
शनिवारी दुपारी श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी अचानक आलेल वादळ आणि वीज कडकडाट यात अर्धा ते पाऊण तास पाऊस आला. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना धावपळ करावी लागली. कांदा झाकण्यासाठी त्यांची धावाधाव झाली. अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेले. पारगाव सुद्रीक परिसरात कुलांगे मळ्यात एक गोठ्यावर वीज पडल्याची माहिती मिळली. यात भिंत आणि छताचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. नगर शहरात उशिरा सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या