Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबदलापूरमध्ये लाठीचार्ज; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर

बदलापूरमध्ये लाठीचार्ज; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर

ठाणे |Thane
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. या ठिकाणी हजारो आंदोलक उपस्थित होते. त्यांना पांगवण्यासाठी आता पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला.

आंदोलकांमुळे बदलापुरची रेल्वे सेवा जवळपास ९ तास ठप्प झाली होती. मंत्री गिरीश महाजन स्वत: रेल्वे स्थानकावर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले. त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आवाहन महाजनांनी केले होते. पण तरीही आंदोलक हटले नाहीत. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते.

- Advertisement -

त्यामुळे, अखेर पोलिसांनी आदोलकांवर लाठीमार करत जमाव पांगवला. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलकांची धावपळ झाली. यावेळी काहीजण जखमी झाले. काहींना भोवळ आली. तर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने मोठ्याप्रमाणात दगडफेक केली. सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. संतप्त झालेल्या आंदोलनकांनी बदलापुरमध्ये एसटीवर दगडफेक केली. एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे बदलापूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

सरकारच्या मध्यस्थीला यश नाही
आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. आरोपीला आजच फाशीची शिक्षा करा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत सकाळी साडे सहा पासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल्वे ट्रॅक अडवून ठेवला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...