Sunday, November 17, 2024
Homeक्राईमबदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर?

बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर?

पोलीसांचा सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार

बदलापूर | Badlapur

बदलापुर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या (Badlapur Sexual Assault) घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Accused Akshay Shinde) याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एपीआय निलेश मोरे (API Nilesh More) हे जखमी झाले आहे.

- Advertisement -

सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान पोलीस आरोपी शिंदे याला तळोजा जेलमधुन ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापुर येथे घेऊन जात असताना त्याने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी (Firing)झाडली. व पोलीसांवरही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. यात पोलीसांनीही त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी (Self Defense) गोळीबार केला. यात एपीआय मोरे हे जखमी झाले. तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये आरोपी अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. त्यामुळे हा एन्काऊंटर कि आत्महत्या? (Suicide) असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जखमी अक्षय शिंदेला (Accused Akshay Shinde) ठाण्यातील कळवा (Kalawa) येथील रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पोलीसांकडून याप्रकरणी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू होती. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले होते.

याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या