मुंबई | Mumbai
बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी शाळेच्या संस्थापक आणि सचिवाला अटक करण्यात आली होती. पण अवघ्या २४ तासांमध्ये संचालक आणि सचिवाला जामीन मिळाला आहे. दोन पैकी एका प्रकरणामध्ये जामीन देण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानुसार अटक करण्यात आली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आल्याच्यानंतर २ आठवड्यानंतर संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी कर्जतमधून अटक केली होती. आज दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले असता त्यावेळी पहिल्या पीडित प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील पहिल्या प्रकरणात दोन्ही आरोपींना कोर्टाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. तर, दुस-या पीडित प्रकरणी गुन्हा दाखल असेलल्या प्रकरणी दोन्ही आरोपींना कोर्टाच्या परवानगीने अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दुस-या एका गुन्हात दोन्ही आरोपींची अटक परवानगी मागितली आणि कोर्टाने दोन्ही आरोपींना अटक करण्याची परवानगी दिली. पोलिसांनी आरोपींना ३९१ नुसार कोर्टातूनच अटक केली.
ट्विस्टवर ट्विस्ट
बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुली होत्या. या प्रकरणी दोन एफआयर दाखल करण्यात आले होते. एका गुन्ह्यात तत्काळ जामीन मिळाला. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार कोर्टाने परवानगी दिली. त्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी कोर्टातूनच अटक केली. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळाले. आज दिवसभरात त्यांना एकाच वेळी जामीन मिळाला त्यानंतर पोलिसांनी लगेच अटक केली.
काय होते प्रकरण?
बदलापूर मधील एका नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अक्षय शिंदेसह शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका गुन्ह्यामध्ये तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. मात्र, दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून उद्या कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा