Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाBadminton : चिराग-सात्विकनं इतिहास रचला, जगज्जेत्यांना हरवून Indonesia open च्या विजेतेपदावर कोरले...

Badminton : चिराग-सात्विकनं इतिहास रचला, जगज्जेत्यांना हरवून Indonesia open च्या विजेतेपदावर कोरले नाव

दिल्ली | Delhi

भारताचे स्टार बॅटमिंटनपटू सात्विकसाईराज रानकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी इतिहास रचला आहे. जगज्जेत्याला नमवून इंडोनेशिया ओपनमध्ये विजय मिळवत भारतीय शिलेदारांनी तिरंग्याची शान वाढवली. अशी कामगिरी करणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली.‌ यापूर्वी कोणत्याही भारतीय स्पर्धा जिंकलेली नव्हती.

- Advertisement -

पुरूष दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विकसाईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मलेशियाच्या आरोन चिया आणि सू वू यिक या जोडीचा पराभव केला. ४३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने मलेशिय जोडीचा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही BWF 1000 स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. भारतीय जोडीने अंतिम सामना २१-१७, २१-१८ असा जिंकला.

उत्तर भारतात उष्णतेचा कहर! UP, बिहारमध्ये उष्माघाताने ३ दिवसांत ९८ जणांचा मृत्यू… रेड अलर्ट जारी

सात्विकसाईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला सेमी फायनलमध्ये विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. पण अंतिम फेरीत या जोडीने सहज विजय मिळवला. भारतीय जोडीने सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिला सेट २१-१७ असा जिंकला. त्याचवेळी सात्विक-चिराग जोडीने दुसरा सेट २१-१८ अशा फरकाने जिंकून इतिहास रचला.

Adipurush : ‘आदिपुरुष’ सिनेमातले ‘ते’ वादग्रस्त डायलॉग बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती

गेल्या एका वर्षात हे दोघे भारताचे सर्वात यशस्वी खेळाडू ठरले आहेत. सात्विक-चिराग जोडीने गेल्याच वर्षी सुपर-७५० फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ही पहिलीच जोडी होती. यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या