Thursday, June 20, 2024
Homeधुळेटाकरखेडा आत्महत्या प्रकरणी तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

टाकरखेडा आत्महत्या प्रकरणी तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

- Advertisement -

टाकरखेडा (ता.शिंदखेडा) येथील माजी उपसरपंच धीरेंद्रसिह सिसोदिया आत्महत्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या तिघांचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला आहे.

राजकीय तक्रारींना कंटाळून टाकरखेड्यात आत्महत्या ?

माजी उपसरपंच तथा गावाचे पॅनलप्रमुख धीरेंद्रसिंह सिसोदिया यांनी वारंवार होत असलेल्या तक्रारींमुळे आत्महत्या केली होती.

त्यावर त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन टाकरखेड्यातील अनिता नरेंद्र गिरासे, नरेंद्र दलपतसिंह गिरासे, सागर लक्ष्मणसिंह गिरासे व बन्सीलाल दलपतसिंह गिरासे यांच्या विरूध्द भांदवि कलम 306, 506 व 34 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काल त्यावर सुनावणी होवून बन्सीलाल दलपतसिंह गिरासे यांना वगळून उर्वरित तिघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या