Friday, May 31, 2024
Homeनगरराहात्यात बैलपोळा उत्साहात, यांत्रिकीकरणामुळे बैलांची घटली

राहात्यात बैलपोळा उत्साहात, यांत्रिकीकरणामुळे बैलांची घटली

राहाता | वार्ताहर

करोनाचे संकट दूर झाल्यानंतर शुक्रवारी शहरात शेतकरी बांधवांनी बैल पोळा सण उत्साहात साजरा केला. राहता शहरातील वीरभद्र मंदिरासमोर मैदानात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता राहाता शहरातील शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांची सजावट करून बँड पथकाच्या तसेच ढोल ताशाच्या गजर करत बैलांची मिरवणूक काढली.

- Advertisement -

राहाता बाजार तळ येथे करोनाच्या संकटानंतर शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी बैलपोळा सण पाहण्यासाठी गर्दी केली होती. वीरभद्र ट्रस्टने बैल पोळा निमित्त फटाक्यांची आतिषबाजी तसेच गुलाबाची उधळण करत या सणाचा उत्साह वाढवला. वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे वतीने त्यांच्याकडे असलेल्या बैलाची उत्कृष्टपणे सजावट केली होती. तसेच राहाता येथील शेतकरी शिवाजी आनप व बाळासाहेब सदाफळ यांनी त्यांच्या बैलांची शहरातून संवाद्य मिरवणूक काढली. या दोन मिरवणुका शहरातील बैलपोळ्याचे आकर्षण ठरले.

सायंकाळी वीरभद्र देवतांची आरती झाल्यानंतर ट्रस्टच्या सदस्यांनी तसेच गावकरी मंडळींनी ट्रस्टच्या बैलाची मिरवणूक काढून राहाता शहराच्या वेशीतमध्ये आणून सोडले. त्यानंतर शेतकरी बांधवांनी वाजत गाजत बैले आपल्या घरी नेले. सध्याच्या अधिनिक युगात मध्ये जलद गतीने काम व्हावीत यासाठी आपण अपडेट राहावे यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकी उपकरणांचा वापर सुरू केला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणाऱ्या बैलांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. परिणामी राहाता शहरात शुक्रवारी बैलपोळ्यावर यांत्रिक युगाची सावट दिसून आले.

सध्याच्या डिजिटल युगात ट्रॅक्टरने शेती मशागत व पिकांसाठी औषध फवारणी जलद गतीने होऊन वेळेची बचत होते तसेच बैल जोडी सांभाळण्यासाठी स्वतंत्र एका व्यक्तीची गरज असते व बैलांना लागणारे खाद्य ,चारा हे शेतकऱ्यांना न परवडणारे असल्यामुळे अनेकांनी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा सहारा घेतला आहे. त्यामुळे बैलांची संख्या घटली आहे.

वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ राजेंद्र गायकवाड, चांगदेव गिधाड, बाळासाहेब सोनटक्के, सतीश बोठे, सागर भुजबळ, पोपट कोल्हे, अनिल ब़ाठे, दिलीप वाघ ,आबा मेचे, विजय गाडेकर, कैलास सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजुरकर , साहेबराव निधाने, डॉ. स्वाधिन गाडेकर , प्रवीण सदाफळ, सर्जेराव मते ,विजय सदाफळ, डॉ. महेश गव्हाणे, अण्णा लांडबिले, गोटू बोरकर, सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर, चांगदेव गाडेकर, सुकदेव गायकवाड, रवींद्र सदाफळ, पप्पू कार्ले यांच्यासह शेतकरी बांधव व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या कुटुंबात पिढी जात बैलजोडी सांभाळण्याची परंपरा आहे. बैल जोडी सांभाळण्यासाठी स्वतंत्र एका व्यक्तीची गरज लागते. जनावरांचे खाद्य चारा अत्यंत महाग झाल्याने बैल जोडी संभाळण्यासाठी मोठा खर्च लागतो. शेती मशागत जलद गतीने व्हावी यासाठी अनेक जण यांत्रिकी पद्धतीचा वापर करतात परंतु पेरणीसाठी बैलजोडीची पसंती असल्यामुळे बैलजोडी सांभाळण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे.

शिवाजी आनप ,शेतकरी राहाता

करोनाच्या संकटंनंतर यावर्षी बैलांची साज विक्री बऱ्यापैकी आपल्या परिसरात बैल जोडी कमी असली तरीही शेतीसाठी पूरक समजला जाणारा दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांनी आपल्या पाळीव जनावरांसाठी पोळ्या सणाला सजावट साहित्य चांगल्या प्रमाणात खरेदी यावर्षी ग्राहकांनी खरेदीला चांगली पसंती दर्शवली.

देवेंद्र कुंभकर्ण, व्यवसायिक राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या