Monday, November 25, 2024
Homeनगरबैलपोळ्या निमित्त पुणतांब्याची बाजारपेठ सजली

बैलपोळ्या निमित्त पुणतांब्याची बाजारपेठ सजली

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

आज साजर्‍या होणार्‍या बैल पोळ्यानिमित्त (Bail Pola) पुणतांबा (Puntamba) येथील बाजारपेठ सजली आहे. येथील स्टेशन रोडवर असंख्य दुकाने थाटलेली आहेत. यावेळी बळीराजाची आपल्या बैल जोडीला सजवण्यासाठी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली होती. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात (Bail Pola Festival) केला जातो. सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि विभूषणांने सजवलं जातं. घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो. ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल विकत आणून त्याची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त करतात.

- Advertisement -

हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी बैलाच्या खांद्याला व मानेला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला खांदे शेकणे अथवा खांड शेकणे म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणार्‍या बैलकरी व्यक्तीस नवीन कपडे देण्यात येते.

या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये व बालगोपालांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणा दिवशी महाराष्ट्रातल्या (Maharashtra) खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस झडत्या ही बैलपोळ्याची गाणे म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर ज्याला गावात मानतात. तो गावातील मुख्य व्यक्तीचा असतो. ती व्यक्ती तोरण तोडतो व पोळा फुटतो. नंतर बैल देवळात दर्शनासाठी नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणार्‍यास बोजारा देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात येतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या