Thursday, December 12, 2024
Homeनगरबैल पोळ्यातील वादातून दोन गटांत राडा

बैल पोळ्यातील वादातून दोन गटांत राडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बैल पोळ्यामध्ये गर्दीत धक्का लागल्याच्या कारणातून 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी कामरगाव (ता. नगर) शिवारात दोन गटांत चांगलाच राडा झाला. लोखंडी पाईप, लाकडी दांडक्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 17) गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

नितीन मारूती भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुयोग प्रकाश कातोरे, भाऊसाहेब प्रकाश कातोरे, प्रवीण बाळाभाऊ गुंजाळ, प्रणव प्रवीण गुंजाळ, करण बबन कातोरे (सर्व रा. कामरगाव) व इतर नऊ ते 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा पुतण्या व सुयोग कातोरे यांच्यामध्ये बैल पोळ्यामध्ये गर्दीत धक्का लागल्याने किरकोळ वाद झाले होते. यावरून सायंकाळी आठ वाजता सुयोग कातोरे व इतरांनी मारहाण केली.

दुसर्‍या गटाचे कैलास प्रकाश कातोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन मारूती भुजबळ, संजय मारूती भुजबळ, रोहन दत्तात्रय भुजबळ, सोहन दत्तात्रय भुजबळ, रोहन सुनील भुजबळ, सुयोग सुनील भुजबळ, प्रफुल्ल बाळासाहेब भुजबळ, शिवम संजय भुजबळ, प्रीतम नितीन भुजबळ, तेजस सुनील ठोकळ (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास कातोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बैल बसविण्याच्या कारणावरून नितीन भुजबळ व इतरांनी लोखंडी पाईप, लाकडी काठीने मारहाण केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या