Saturday, May 25, 2024
Homeनगरशेवगाव : बक्तरपूर पुलाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे सादर

शेवगाव : बक्तरपूर पुलाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे सादर

बक्तरपूर |वार्ताहर| Bakatarpur

शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील रेडी नदीवरील अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुलाची जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी दखल घेऊन

- Advertisement -

पुलाचे सर्वेक्षण करण्याचे संबंधित खात्याला आदेश दिले होते. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाने सर्वेक्षण करून 48 लाख 50 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले. श्री. घुले दाम्पत्यांनी तातडीने दखल घेतल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे बक्तरपूर – मजलेशहर या जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरील जुना पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होऊन जनतेची गैरसोय झालेली आहे.

याबाबत दैनिक सार्वमतने बातमी प्रसिध्द करून प्रशासनासह राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उपविभाग शेवगाव उपअभियंता रमेश शिदोरे यांनी पाहणी करून प्रजिमा-30 ते बक्तरपूर, मजलेशहर रस्ता सा. क्र. 0/200 (इजिमा-251) रेडी नदीवरील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन लो लेव्हल कॉजवेचे अंदाजपत्रक 48 लाख 50 हजार रुपये मंजुरीस्तव प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे.

2020-21 मध्ये कोव्हिड-19 मुळे शासनाकडे निधी उपलब्ध नाही.खास बाब म्हणून शासनाच्या पूरहानी दुरूस्ती कार्यक्रमाअंतर्गत नियोजन निधी, जिल्हा परिषद सेस यापैकी प्राधान्याने निधी उपलब्ध होणार्‍या लेखाशीर्षातून मंजुरी प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला.

नुकसानग्रस्त भागाकडे लोकप्रतींनिधीसह खासदारांचे दुर्लक्ष

अतिवृष्टीने बक्तरपूर, भातकुडगाव, भायगाव व परिसराला अक्षरशः झोडपून काढले.ऊस पिके भुईसपाट झाली आहेत. खरीप पिकाबरोबर बंधारे, पुलाचे नुकसान झाले.रस्त्याची तर अक्षरशः वाट लागली. काही ठिकाणी पायी चालणे मुश्किल झाले आहे.वाहन धारकांना तर आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.बळीराजा नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे कधी होतील याकडे लक्ष देऊन आहेत. मात्र दक्षिण लोकसभेचे खासदार, शेवगाव – पाथर्डीच्या लोकप्रतिनिधी गप्प आहेत. या लोकप्रतिंनिधीकडून तालुका प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश नाहीत.नुकसान ग्रस्त भागाकडे खासदार,आमदारचे साफ दुर्लक्ष दिसून येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या