Thursday, June 20, 2024
Homeनगरदेडगाव येथे 111 वटवृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा

देडगाव येथे 111 वटवृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा

बालाजी देडगाव |प्रतिनिधी| Balaji Dedgav

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री पावन गणपती वनराई प्रोजेक्ट अंतर्गत जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर व जय हिंद वृक्ष बँक अहमदनगर यांच्या माध्यमातून लावलेल्या 111 वडाच्या झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

देडगाव- माका रोडवरील पावन गणपती मंदिर परिसरात हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी मेजर शिवाजीराव पालवे होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुखदेव महाराज मुंगसे, श्री. तांदळे, कुंडलिकराव कदम, माजी सभापती कारभारी चेडे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के, चंद्रकांत मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, बाबासाहेब मुंगसे, प्राचार्य स्वरूपंचंद गायकवाड, मेजर शिवाजीराव गर्जे, आधार सेवा फाउंडेशनचे जयवंत मोटे, माकाचे माजी सरपंच रामदास घुले, महेश काळे, बाबासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे, संभाजी मुंगसे, नवनाथ मुंगसे, निलेश कोकरे, पाचुंदा उपसरपंच बंडू गोफणे, आकाश चेडे, गुलाबभाई शेख, कृष्णा काकडे,गहिनीनाथ पठाडे, देवराव मुंगसे, बन्सी कुटे, रामभाऊ काजळे, काकासाहेब काळे, मधुकर तांदळे, उद्धव तांदळे, ज्ञानेश्वर गोयकर, तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक वृंद आदी मान्यवर तसेच देडगाव, पाचुंदा व माका येथील ग्रमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मेजर शिवाजी पठाडे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले. तर अशोक मुंगसे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या