Wednesday, July 24, 2024
Homeनगरबालमटाकळीत जुगार अड्ड्यावर छापा

बालमटाकळीत जुगार अड्ड्यावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 9 जुगार्‍यांकडून आठ मोबाइल व तिरट जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 95 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रजनीकांत अंधारे (रा. बोधेगाव), संदीप बांमदळे (रा, बालमटाकळी), अंबादास राठोड (रा. नागलवाडी), लियाकत शेख (रा. बोधेगाव), गौरव अंधारे (रा. बोधेगाव), कमरुद्दीन शेख (रा. बालमटाकळी), शाहरुख शेख (रा. बोधेगाव), लियाकत शेख (रा. बालमटाकळी), लक्ष्मण मार्कड (रा. रामनगर, ता. पैठण) असे ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना बालमटाकळी येथे रजनीकांत अंधारे याच्या घराच्याजवळ तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 9 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 4 लाख 95 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या