Saturday, November 23, 2024
Homeनगर"तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र…"; थोरातांचा विखेंवर पलटवार

“तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र…”; थोरातांचा विखेंवर पलटवार

अहमदनगर । Ahmednagar

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले होते. परंतु, बाळासाहेब थोरात यांनी या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.

- Advertisement -

भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिले होते. याच दरम्यान आता बाळासाहेब थोरात यांनी एक्स वर पोस्ट करत विखे पाटलांना प्रतिआव्हान दिले आहे. तसेच, “तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे.” असं म्हणत खोचक टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

बाळासाहेब थोरात यांनी एक्सवर पोस्ट करत म्हंटले आहे की, महसूल मंत्री महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल.

बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे. असं म्हणत त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे. तसेच आ. रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो. असं देखील थोरात यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या