मराठा आरक्षण: मेटेंकडून ठाकरे, चव्हाणांवर ‘हा’ मोठा आरोप
नागपूर । Nagpur
- Advertisement -
अशोक चव्हाण हे उत्तम काम करत आहे, मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी राजकारण करू नये, असे बाळासाहेब थोरात यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हंटले आहे.
तसेच मराठा आरक्षणावरून राज्य सरकार देखील अनेक वेळा विविध बैठका घेऊन चर्चा करत आहे. त्यामुळे विनायक मेटेंच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.
विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून ठाकरे व अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असुन आरक्षणाबाबत त्यांच्या मनात पाप असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांच्यावर केला होता.