Saturday, May 3, 2025
Homeनाशिकबाळासाहेब वाघ कर्मयोगी व्यक्तिमत्व : थोरात

बाळासाहेब वाघ कर्मयोगी व्यक्तिमत्व : थोरात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बाळासाहेब वाघ यांच्या चरित्र्याला कर्मवीर काकासाहेब वाघ (Karmaveer Kakasaheb Wagh) यांच्या विचारांचा वारसा लाभला. या विचारातून त्यांनी आयुष्यभर दीपस्तंभा सारखे काम केले. पुरोगामी विचारांची पिढी म्हणून कर्मवीर काकासाहेब वाघ यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे बाळासाहेब वाघ यांना कर्मयोगी उपाधी देत त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशा भावना महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Former Revenue Minister MLA Balasaheb Thorat)यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल व स्पिनॅच संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांसह संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, स्माईल व स्पिनॅचचे सचिव अजिंक्य वाघ, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. सुधीर तांबे, दिलीप बनकर, सीमा हिरे, माजी आमदार अनिल कदम, संस्थेचे विश्वस्त मंडळ, सचिव प्रा. के एस बंदी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते.

संस्था गीताने कार्यक्रमास सुरु झाला यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. के एन नांदुरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि कृषी व कृषी संलग्न या तिन्ही महाविद्यालयांच्या असोसिएशनच्या वतीने दिवंगत बाळासाहेब वाघ यांच्या नावे सर्वोत्तम संस्था, सर्वोत्तम प्राचार्य, सर्वोत्तम शिक्षक व जीवनगौरव पुरस्कार यांची घोषणा केली. संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजेश टोपे म्हणाले की, गेल्या वर्षी बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त पुढच्या पिढीने बाळासाहेब वाघ यांच्या विचारांचा वारसा चालवला पाहिजे हीच खरी भाऊंना आदरांजली होईल. शिक्षण क्षेत्रात केलेले काम पाहता के के वाघ शिक्षण संस्थेने बाळासाहेब वाघ यांच्या नावे विद्यापीठ सुरु करावे अशी भावना कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केली. डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, डॉ. सुधीर तांबे, दिलीप बनकर, सीमा हिरे व माजी कुलगुरु डॉ. शंकरराव मगर यांनी कै. बाळासाहेब वाघ यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन स्वाती पवार व प्रा. जागृती निकम यांनी केले. अजिंक्य वाघ यांनी आभार मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

0
जळगाव - Jalgaon संभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून, कायदा व सुव्यवस्था अबाधित...