नवी दिल्ली | New Delhi
पाकिस्तानामध्ये (Pakistan) जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे तब्बल ९० जवान ठार (Killed) झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली असून या घटनेमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पवर नोशिकी येथे आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णालयांत (Hospital) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने (BLA) स्वीकारली आहे.
हल्ल्यानंतर बलूच आर्मी काय म्हणाली?
बलूच लिबरेशन आर्मीने या हल्ल्ल्यानंतर म्हटले की, “बलूच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोशकीमध्ये आरसीडी हायवेवर रखशान जवळ वीबीआयईडी फिदाई हमला केला.आमच्या ताब्यातील पाकिस्तानी सैनिकांना निशाणा बनवले आहे. या ताफ्यात ८ बसेस होत्या, यातील एक बस स्फोटात पूर्णपणे नष्ट झाली आहे”, असे त्यांनी सांगितले आहे.