Saturday, May 4, 2024
Homeनाशिकबाहेरील कोंबड्या,साहित्यास जिल्हाबंदी

बाहेरील कोंबड्या,साहित्यास जिल्हाबंदी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यात बर्डफ्लुचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा व प्राण्यांचे संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार शेजारील जिल्ह्यातील कोंबड्या, कुक्कूट पालन क्षेत्राशी सबंधीत साहित्यास जिल्ह्यात प्रवेश देण्यावर बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

राज्यातील इतर जिल्ह्यात बर्डफ्लुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत अनेक ठिकाणी उडणारे पक्षी, पाळीव पक्षी तसेच कोंबड्या मृत झाल्या आहेत. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये कुक्कुट पालकांकडील लाखोच्या संख्येत कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. याचा संसर्ग हळुहळू जिल्ह्यात पसरण्यास सुरूवात झाली आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लु प्रभावीत क्षेत्र आढळुन आले आहे. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत प्राण्यांमधील संक्रमाण व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार तसेच कृषी विभागच्या अधिसुचनेनुसार हा आदेश काढण्यात आला आहे.

यानुसार बर्ड फ्लु प्रभावीत जिल्ह्यांमधून कोंबड्या, कोंबड्यांचे मांस, अंडी, कोंबडी खत, पक्षीखाद्य, कुक्कुट पालनासाठी आवश्यक सर्व प्रकारचे साहित्य व उपकरणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या