जम्मू-काश्मीर । Jammu-Kashmir
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ जवान गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी स्थानिक प्रशासन व लष्करी पथकांनी तातडीने धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र तपास सुरू आहे.