Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशबांगलादेशमध्ये आंदोलकांची धुडगूस, हिंसाचार, जाळपोळ सुरुच; अवामी लीगच्या २० नेत्यांची हत्या

बांगलादेशमध्ये आंदोलकांची धुडगूस, हिंसाचार, जाळपोळ सुरुच; अवामी लीगच्या २० नेत्यांची हत्या

प्रसिध्द गायकाचे घर जाळले, अभिनेत्याची जमावाकडून हत्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतरही बांगलादेशातली परिस्थिती शांत होताना दिसत नाहीये. राजकीय पक्ष असलेल्या अवामी लीगच्या अनेक नेत्यांवर हल्ले होत असून त्यातील २० नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. आत्ता पर्यंत २० नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह सापडले आहे.

- Advertisement -

अनेक अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची आणि उद्योग धंद्यांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. सातखीरा सदर आणि श्यामनगर पोलीस ठाण्यातही जाळपोळ आणि लुटमार झाल्याची नोंद पोलिसांनी केली. अवामी लीगच्या दोन मंत्र्यांना विमानतळावरुन देश सोडण्याच्या तयारीत असतानाच ताब्यात घेण्यात आले आहे, तर काही जण रविवारी रात्रीच पळून जाण्यात यशस्वी ठरले आहे.

कोमिल्ला येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात ११ जण ठार झाले. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला अज्ञातांनी लावलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी त्यांचे मृतदेह घरातून बाहेर काढण्यात आले. तर, नाटोर-२ मतदारसंघाचे खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला देखील संतप्त जमावाने लावलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे घरांच्या छतावर, बाल्कनी, खोल्यांमध्ये मृतदेह आढळून आले आहे.

बांगलादेशचा प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचे ढाक्यातील धानमंडी भागातील १४० वर्षे जुने घर संतप्त आंदोलकांनी जाळले आहे. तत्पूर्वी या घरात लुटालुट करण्यात आली होती. तसेच, प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. अभिनेता शांतो खानचे वडील सलीम खान हे चांदपूर सदर उपजिल्हाच्या लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते. ते चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकही होते. या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले
बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, देशातील २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले झाल्याच्या बातम्या येत आहेत. बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामीने शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याची कबुली दिली आहे. हिंदू मंदिरांनाही लक्ष्य केले जात असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या