पुणे | Pune
एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा १७ वा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. त्याआधी आज बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला गोलंदाजी करावी लागली. बांगलादेशकडून तनजीद हसन आणि लिटन दास यांनी डावाची सुरुवात केली. यामुळे बांगलादेशने ५० षटकांत ८ गडी गमावत २५६ धावांपर्यंत मजल मारली असून भारताला २५७ धावांचे आव्हान दिले आहे…
बांगलादेशच्या सलामी फलंदाजांनी भारताची गोलंदाजी चांगलीच फोडून काढली. त्यानंतर कुलदीप यादवने तन्जिद हसनला ५१ धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर रविंद्र जाडेजाने शांतो याला ०८ धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद सिराजने मिराजला बाद करत बांगलादेशला तिसरा झटका दिला. तर रविंद्र जाडेजाने लिटन दासला ६६ धावांवर तंबूत पाठवत चौथा धक्का दिला. जाडेजाने दहा षटकांत ३८ धावा देत दोन गाडी बाद केले.