Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबांगलादेशी महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ! ५ जणांना मुंबईतून अटक

बांगलादेशी महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ! ५ जणांना मुंबईतून अटक

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली, विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने केलेल्या प्रचार आणि प्रसाराच परिणामही निवडणुकांच्या निकालात पाहायला मिळाला. आता, अपात्र लाडक्या बहि‍णींना अर्ज करुन योजना बंद करण्याचं आवाहन सरकारकडून केले जात असतानाच बांगलादेशी महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वास्तव्याला असणाऱ्या बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. सरकारकडून तिला लाभही देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. सध्या मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई सुरू असून कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील कामठीपुरा येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. महादेव यादव या ३४ वर्षीय एजंटलाही या बांगलादेशी व्यक्तींना आश्रय देणे आणि रसद पुरवण्याचा ठपका ठेवत अटक केली आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेचे नाव उर्मिला खातुन असे असून ती २३ वर्षांची आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरीच पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, ज्या महिलांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अटक करण्यात आलेल्या इतर बांगलादेशी नागरिकांची ओळखही पटली आहे. अटकेत असलेल्या बांगलादेशींची नावे जलाल शेख, अलीम रसूल अली आणि मोहम्मद ओसिकुर रहमान अशी आहेत. रहमानने बांगलादेशातून मुंबईत तरुणी आणि महिलांची तस्करी केल्याचे, पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता २०२३, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, १९५०, परदेशी कायदा, १९४६ आणि परदेशी आदेश, १९४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...