Monday, April 28, 2025
Homeदेश विदेशभारतीय बँकांना 414 कोटींना गंडा

भारतीय बँकांना 414 कोटींना गंडा

सार्वमत 

कंपनीच्या मालकासह चार अध्यक्षांविरोधात गुन्हा
नवी दिल्ली – भारतातील सहा बँकांना सुमारे 414 रुपयांना गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या ‘राम देव इंटरनॅशनल लिमिटेड’ या बासमती तांदळाचा व्यापार करणार्‍या कंपनीच्या मालकासह चार अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे भारतीय बँकांना गंडा घालून परदेशात पळून जाणार्‍यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

- Advertisement -

स्टेट बँक आणि अन्य काही बँकांकडून सुमारे 414 कोटी रूपयांचं त्यानं कर्ज घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तब्बल चार वर्षांपर्यंत त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. परंतु आता तो बँकांना गंडा घालून परदेशात गेल्याची माहिती समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं केलेल्या तक्रारीनुसार सीबीआयनं त्या कंपनीचा मालक आणि चार अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या व्यक्तीनं 6 बँकांकडून कर्ज घेतलं असून 2016 पासून तो बेपत्ता असल्याची माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे.

2016 मध्येच कंपनीला एनपीए घोषित करण्यात आलं होतं. तब्बल चार वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात स्टेट बँकेकडून याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर 28 एप्रिल रोजी सीबीआयनं त्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. एनडीटीव्ही इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामदेव इंटरनॅशनल या कंपनीनं 414 कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. ज्यापैकी 173.11 कोटी स्टेट बँकेकडून, 76.09 कोटी रूपये कॅनरा बँकेकडून, 64.31 कोटी यूनियन बँक ऑफ इंडिया, 51.31 कोटी रूपये सेंट्रल बँकेकडून आणि 36.91 कोटी आणि 12.27 कोटी रूपये अनुक्रमे कॉर्पोरेशन बँक आणि आयडीबीआय बँकेकडून घेतले होते.

सीबीआयनं सध्या कंपनी कंपनीचे अध्यक्ष नरेश कुमार, सुरेश कुमार, संगीत आणि काही अज्ञात सरकारी अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहिनीनं आपल्या हाती या तक्रारीचं कॉपी आल्याचा दावाही केला आहे. यामध्ये कंपनीला एनपीएमध्ये टाकल्याचंही सांगण्यात आलं आहे. 2016 मध्ये करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये संबंधितांना खात्यात काही गडबड केल्याचं समोर आलं होतं. तसंच बॅलंस शीटमध्ये फसवणूक आणि अन्य बाबी केल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर बँकेकडून तपास सुरू करण्यात आला होता. तेव्हा कंपनीचे सर्व सदस्य गायब असल्याचं समोर आलं. त्यानंतर ते देशाबाहेर गेल्याची माहितीही समोर आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...