Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशखासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

दिल्ली l Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

द युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन (UFBU) या नऊ युनियनच्या बॉडीने मार्च महिन्यात १५ आणि १६ तारखेला दोन दिवस संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सलग चार दिवस बँकिंग सेवा बंद राहील. संपाच्या आधी १३ मार्चला महिन्याचा दुसरा शनिवार तर १४ ला रविवार असल्यानं बँकांना सुट्टी असणार आहे. त्यानंतर सोमवार, मंगळवार असे दोन दिवस संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

द युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमध्ये ऑल इंडिया बॅंक एम्पलॉयी असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉन्फडरेशन, नॅशनल कॉनफडरेशन ऑफ बॅंक एम्पलॉयी, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, बॅंक एम्पलॉयी कॉन्फ़डरेशन ऑफ़ इंडिया यांचा समावेश आहे.

दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीच्या योजनेंतर्गत दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली. २०१९ मध्ये सरकारने आधीच आयडीबीआय बँक खाजगी बनविली आहे. यासाठी बँकेचा बहुतांश हिस्सा LIC ला विकला गेला आहे. तसेच, गेल्या काही वर्षांमध्ये १४ सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या