Tuesday, September 17, 2024
Homeदेश विदेशबँकांना असणार सलग सुट्ट्या, महत्वाची कामं घ्या तत्काळ करून

बँकांना असणार सलग सुट्ट्या, महत्वाची कामं घ्या तत्काळ करून

मुंबई । Mumbai

- Advertisement -

अनेक जण नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्याचं प्लॅन करीत आहेत. दरम्यान, यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण आपल्या बँकांची कामे करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे ९ दिवस उरले आहेत. या आठवड्यात तुम्हाला बॅंकेशी संबंधीत महत्वाची कामे असतील तर गुरूवारपर्यंत पूर्ण करून घ्या. कारण

२४ डिसेंबरनंतर सलग तीन दिवस बॅंका बंद असणार आहेत. २५ डिसेंबर (शुक्रवार) ख्रिसमसमुळे राष्ट्रीय सुट्टी आहे. यामुळे बँकांमध्ये हा दिवस सुट्टीचा दिवस आहे. २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे ज्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. यानंतर, २७ डिसेंबर रोजी रविवार आहे. हा दिवस बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवडी सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँकाना सुट्टी असणार आहे. म्हणून जर आपले बँकेसंबंधी काही काम असल्यास ते २४ डिसेंबर (गुरुवार) पर्यंत पूर्ण करावे. कारण त्यानंतर २५, २६ आणि २७ डिसेंबर रोजी बँकांना सुट्ट्या असतील. त्यामुळे याआधी आपले बँकेचे व्यवहार आटोपणं हे फायदेशीर ठरणार आहे.

३१ डिसेंबरपूर्वी सर्व करदात्यांना त्यांचे कर भरावे लागतात. लक्षात ठेवा की तुम्हाला हे काम गुरूवारपर्यंत करायचे आहे. हा वर्षाचा शेवटचा आठवडा असल्याने सर्वांना त्यांच्या पैशांशी संबंधित अनेक कामे करावी लागतील. म्हणून तुम्हीही बँकेचे काम वेळेत पूर्ण करावे. १ जानेवारी २०२१ पासून पैसे आणि बँकेशी संबंधित बरेच नियम बदलतील. आयकर परताव्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट, व्याज उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म २६ एएस अशी अनेक प्रकारची कागदपत्रे बॅंकेकडून घ्यावी लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या