Friday, October 18, 2024
Homeनाशिकपेठ चेकनाक्यावर लाखोंचा गुटखा जप्त

पेठ चेकनाक्यावर लाखोंचा गुटखा जप्त

पेठ | प्रतिनिधी
गुजरात राज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतुक करणारे संशयित वाहनाची तपासणी करतांना त्यामध्ये विमल कंपनीचा पानमसाला व तंबाखु याचा सुमारे १४ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल व महेंद्र पिकअप क्र. एमएच१५ जीटी २७०८ असा एकुण १७,५२, १५२ रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. यावेळी तस्करांनी वाहन सोडून पळ काढला.

गुरवार (दि. २९) रोजी रात्री ८ वाजे दरम्यान गुजरातकडून येणाऱ्या वाहनाची तपासणी करतांना हवा. भुसारे व त्यांच्या पथकाने वाहनाची तपासणी करताना त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबधीत असणाऱ्या पानमसाला व तंबाखुच्या गोण्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने आणण्यात आलेला गुटखा आढळून आला. पो. नि. द्वारकानाथ गोंदके यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक पाटील, हवा. भुसारे, पवार यांनी मुद्देमाल पकडला. या प्रकरणी हवा. भुसारे यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या