Friday, May 2, 2025
Homeदेश विदेशचीनी नागरिकांनी शोधला आंदोलनाचा भन्नाट मार्ग; बप्पी लहरींचे 'ते' गाणं वापरून करताय...

चीनी नागरिकांनी शोधला आंदोलनाचा भन्नाट मार्ग; बप्पी लहरींचे ‘ते’ गाणं वापरून करताय सरकारला विरोध

बीजिंग | Beijing

चीनमध्ये करोनाने (Corona) पुन्हा एकदा पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनमधील काही शहरांमध्ये पुन्हा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना सरकार झीरो कोविड पॉलिसीअंतर्गंत काही परिसरात सातत्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. (Bappi Lahiri Song)

- Advertisement -

सरकारच्या या झिरो कोविड पॉलिसीमुळं नागरिक हैराण झाले असून सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी चीनी नागरिकांनी भन्नाट मार्ग शोधला आहे. भारतीय हिंदी गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे १९८२ मधील ‘जि मी-जि मी’ (Jimmy Jimmy) हे चीनी नागरिकांच्या असंतोषाचं प्रतिक बनलं आहे.

टिक-टॉकचे (TikTok) चीनी अ‍ॅप डौयिन (Douyin) वर नागरिकांकडून काही मजेशीर व्हिडिओ शेअर केले जात आहेत. ज्यामध्ये बप्पी लहरींचं जिम्मी जिम्मी गाणं वाजत आहे. मँडारिन भाषेत ‘जि मी-जि मी’चा अर्थ ‘भात द्या भात द्या’ असा होतो. या गाण्यावर अनेकजण हातात रिकामा टोप घेऊन भात/ तांदूळ मागण्याची अ‍ॅक्शन करत आहेत. लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक वस्तूंची देखील वाणवा होत असल्याचं त्यांच्याकडून दाखवलं जात आहे.

(Chinese are protesting with Bappi Lahiri’s Jimmy, Jimmy)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल...

0
पुणे(प्रतिनिधि) राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील भोसरी येथून पोलिसांनी अटक...