Monday, May 20, 2024
Homeधुळेबापरे! माळमाथा परिसरात लिंबू एवढी गार

बापरे! माळमाथा परिसरात लिंबू एवढी गार

निजामपूर ।Nizampur । वि.प्र.

साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील खोरी गावाच्या (Khori village) परिसरात वादळी वार्‍यासह लिंबूएवढ्या गांराचा जोरदार (lemon-like hail) वर्षाव झाला. यामुळे शेतात, रस्त्यांवर आणि सर्वत्र अक्षरशः खच साचला. या गारपिटीमुळे   शेकडो एकर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

- Advertisement -

साक्री तालुक्यातील अन्यत्र केवळ पावसाचे वातावरण तर पश्चिम पट्ट्यात हलकासा पाऊस झाला. मात्र माळमाथा परिसिरातील खोरी, टिटाणे या भागात प्रचंड गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक टंचाई असलेल्या शेतकर्‍यांचा या गारपीटीमुळे तोंडचा घास हिसकावला आहे. कापणीवर आलेला गहू, हरभरा तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

 महसूल कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आज सोमवार दुपारी 4 वाजेच्या सुमारास माळमाथा परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. खोरी परिसरात प्रंचड गारपीट झाल्याने खोरी परिसरातील शेतांमध्ये गाराचा थर साचला. यामुळे रब्बी हगामातील गहू, हरभरा ही पिके काढणीवर आली असतांना मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच कांदा पिकही या गारपीटीमुळे हातातून गेला. काढणीवर आलेला कांदा सडून नुकसान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अवकाळी पावसाने खोरीसह टिटाणे, इंदवे, निजामपूर, जैताणेसह माळमाथा परिसरात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान  झाले.

निजामपूर-जैताणे परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने नगदी उत्पादन देणारे कांदा, गहू, हरभरा या काढणीवर आलेल्या पिंकाचे नुकसान झाले. तसेच विटभट्टी व्यावसायिकांची या पावसामुळे धावपळ झाली.

इदंवे शिवारात दुसर्‍यांदा अवकाळी पावसाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांवर अस्मानी संकट आलेले आहे.  या अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेकडो ऐकर शेतातील गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठया प्रमाणात झाले आहे.

धुळे परिसरातही पाऊस


सकाळपासूनच वातावरणात बदल होवून ढग भरुन आल्याचे जाणवत होते. दुपारी यात आणखी बदल होवून जोरदार पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र सायंकाळी धुळे शहर व परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. आर्वी, बोरकुंड, अजंग, मुकटी, कापडणे, सोनगीर, नेर, कुसुंबा या भागातही पावसाचे वातावरण झाले. काही ठिकाणी वादळही झाल्याने नुकसान झाले आहे.

गारपिटीचा मुद्दा अधिवेशनात मांडणारधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, सह अन्य भागात अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपीट झाली असून शेतकर्‍यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असून शेतकर्‍यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करणार आहे.

-आ.जयकुमार रावल, दोंडाईचा

- Advertisment -

ताज्या बातम्या