Saturday, June 22, 2024
HomeUncategorizedआता आरसी बुक स्मार्ट कार्डवर बारकोड!

आता आरसी बुक स्मार्ट कार्डवर बारकोड!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

यापूर्वी वाहन नोंदणीनंतर दिले जाणाऱ्या आरसी बुकचे रूपांतर स्मार्ट कार्डमध्ये करण्यात आले असून नवीन स्मार्ट कार्ड लेझर प्रिंटरवर तयार केले जात आहे. नवीन स्मार्ट कार्डवर चिपऐवजी बारकोड देण्यात आला आहे. 

दरम्यान, नवीन आरसी बुक आणि लायसन्स पुरवठा करण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर परिवहन कार्यालयाकडे देण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रातून ३ लाख १२ हजार ११९ आरसी बुक आणि लायसन्स पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठुळे यांनी दिली.

लायसन्स आणि आरसी स्मार्ट कार्ड नव्याने प्रिंटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओतून स्मार्ट कार्डच्या प्रिंटिंगला सुरुवात झाली आहे. आरटीओत पूर्वी स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम रोजामार्ट कंपनीकडून करण्यात येत होते. आता हे काम कर्नाटकच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या स्मार्ट कार्डमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन स्मार्ट कार्ड हे लेझर प्रिंटरवर तयार करण्यात येत आहेत पूर्वी स्मार्ट कार्डवर एक चिप येत होती. आताच्या स्मार्ट कार्डवर त्या ठिकाणी बारकोड आले आहे.

दरम्यान, राज्यात नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तीन केंद्रांवरून स्मार्ट कार्ड प्रिंटिंग केली जात आहेत प्रादेशिक परिवहन विभागातून ११ जिल्ह्यांसाठी स्मार्ट कार्ड तयार करून पाठविण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसह सातारा, पिंपरी चिंचवडसह पश्‍चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार ५४७ लायसन्स तर १ लाख ३८ हजार ५७२ आरसी बुक स्मार्ट कार्ड पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या