Friday, July 12, 2024
Homeनाशिकवाडी-वस्तीवर मुलभूत सुविधा : डॉ. पवार

वाडी-वस्तीवर मुलभूत सुविधा : डॉ. पवार

कळवण । प्रतिनिधी Kalwan

- Advertisement -

‘दिंडोरी लोकसभा मतदार संघातील (Dindori Lok Sabha constituency) मतदारांच्या मागणीनुसार कळवण विधानसभा मतदारसंघातील ( Kalwan Assembly constituency )सर्व गाव वाड्या, वस्तीवरील मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी ( Basic amenities on hamlet )केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील असून आगामी अनेक विकास कामे पूर्णत्वास नेले जातील’, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar )यांनी केले.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत विविध कामे राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांनीं मंजूर झाली आहे.

यापैकी कळवण तालुक्यातील रामा 21 गोसराने ते जयपूर गंगापूर रस्ता (6.600 किमी ) सुधारणा व दुरुस्ती देखभाल करणे रक्कम 352.98 लक्ष, खेडगाव ते रवळजी, देसराणे, जयदर, कोसवण, राठीअंबा रस्ता (6.410 किमी) ची सुधारणा करणे रक्कम 360.02 लक्ष, एनएच 953 साकोरे ते जिरवाडे – भुसणी , निवाणे, भेंडी, नवीबेज रस्ता (12. 500 किमी ) ची सुधारणा करणे रक्कम 802.94 लक्ष अशा 16 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी डॉ.पवार पुढे म्हणाल्या की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी सर्व सामान्य गरीबजनतेच्या, कष्टकरी शेतकर्‍यांच्या नेहमीच पाठीशी राहिले असून करोनाकाळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केली आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनचे मोठे काम भारतभर उभे केले असून आता हरघर जल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशनसाठी ( Jaljeevan Mission ) मोठा निधी मंजूर करून प्रत्येक घरी शुद्ध पाणी देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. तसेच आगामी काळात मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनुसार उर्वरित विकास कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून सर्व कामे लवकरच पूर्ण केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat), कार्यकारी अभियंता माळुंदे, उपअभियंता निकम, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी निलेश पाटील, तालुका कृषी आधिकारी मीनल म्हस्के, भाजपा माजी ग्रामीण जिल्हाध्य्क्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधाकर पगार, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. गावित, जेष्ठ नेते गोविंद कोठावदे, निंबा पगार, हितेंद्र पगार, चंद्रशेखर जोशी, कुष्णकांत कामळस्कर, सोनाली जाधव, प्रवीण रौंदळ, अल्पेश शहा, योगेश पवार, गणेश मुसळे, एस के पगार, रुपेश शिरोडे, हेमंत रावले, चेतन निकम, भूषण पगार, सुनिल खैरनार, सोनाली राजभोज, नंदकुमार मराठे, मनोहर ठाकरे, नाना ठाकरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या