Friday, May 31, 2024
Homeनगरसोनई कृषी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत 408 खेळाडूंचा सहभाग

सोनई कृषी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत 408 खेळाडूंचा सहभाग

सोनई |वार्ताहर| Sonai

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, मुळा एज्युकेशनच्या सोनई येथील कृषी महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेमध्ये सोनईच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळविले.पदव्युत्तर महाविद्यालय राहुरी संघाने प्रथम क्रमांक तर कृषी महाविद्यालय अकलूज संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

- Advertisement -

मुलींच्या गटात प्रथम क्रमांक कृषि महाविद्यालय तळसंदे, द्वितीय क्रमांक कृषी महाविद्यालय फलटण तर तृतीय क्रमांक कृषी महाविद्यालय अकलूज संघाने मिळविला.

मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी, भाग्यश्री बिले यांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रासेयोचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, मुळा एज्युकेशनचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे, डॉ. विजय अमोलिक, क्रीडा समन्वयक प्रा. पाटील तुवर, अजय पारखी, रावसाहेब कोतकर, प्राचार्य वैभव आढाव, आसिफ शेख, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदीप तांबे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले म्हणाल्या, मी आज आपल्यासमोर खेळामुळेच उभी आहे. आपण आपला खेळ करत जा, यश निश्चित मिळेल. आयुष्यात फसवाफसवी न करता असा खेळ करा की, कुणाच्या वशिल्याची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन महावीरसिंग चौहान यांनी केले.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये 408 खेळाडू, 40 प्रशिक्षक, 20 संघ व्यवस्थापकांनी आपला सहभाग नोंदविला.सदर स्पर्धेमध्ये एकूण दहा जिल्ह्यातील खेळाडू उपस्थित होते. प्राचार्य डॉ.हरी मोरे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा. संदीप तांबे यांनी केले तर आभार प्रा. सुनील बोरुडे यांनी मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

कृषी महाविद्यालयातील आजपर्यंत घडलेले खेळाडू अनेक मोठ्या पदांवर कार्यरत असून, खेळामुळेच तो घडला जातो आणि जीवनात यशस्वी होतो. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे सोनईला क्रीडा नगरीचे स्वरूप आले होते.

– उदयन गडाख

- Advertisment -

ताज्या बातम्या