Saturday, September 21, 2024
Homeधुळेआयुक्तांच्या दालनाबाहेर अंघोळ आंदोलन

आयुक्तांच्या दालनाबाहेर अंघोळ आंदोलन

धुळे । dhule प्रतिनिधी

- Advertisement -

शहरात पाण्याची गंभीर समस्या (Serious water problem) निर्माण झाली आहे. 15-15 दिवस पाणी पुरवठा होत नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करुनही उपयोग होत नाही. उलट टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे पाण्याच्या समस्येकडे लक्ष (attract attention) वेधण्यासाठी मनविसेने आज आयुक्त देविदास टेकाळे (Commissioner Devidas Tekale) यांच्या दालनाबाहेर अंघोळ आंदोलन (Bath movement) केले.

मनविसेच्या एका कार्यकर्त्याने अंगावर बादलीने पाणी ओतून धुळेकरांना पाणी द्या, असा सूचक इशारा देवून मनपाच्या कारभाराचे पूर्ण वाभाडे काढले. गेल्या अनेक महिन्यांपासून शहराच्या विविध भागात दहा ते बारा दिवस उलटून देखील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. महापालिकेच्या निवडणुकीवेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिले होते; त्याचे काय झाले? असा सवाल मनविसेने उपस्थित केला.

मनपा 365 दिवसांची पाणीपट्टी आकारते. मात्र, प्रत्यक्षात 50 दिवसही पाणीपुरवठा होत नाही. मग उर्वरीत 315 दिवसांची पाणीपट्टी जनतेने का भरावी, असेही मनविसेने विचारले आहे.

पाणी समस्येसाठी महापालिका अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना संपर्क साधला असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. लाईट नसल्याचे कारण देत टाळाटाळ करतात. जर वीजेची समस्या आहे तर मग मनपा प्रशासन महावितरणसोबत चर्चा करणे अपेक्षित आहे. परंतु, धुळेकरांना नियमित पाणी मिळावे; यासाठी मनपा सत्ताधार्‍यांचे कुठलेही ठोस नियोजन नाही. तशी तत्परता दाखविली जात नाही; म्हणूनच आंदोलनाचे अस्त्र उगारल्याची प्रतिक्रिया मनविसे पदाधिकार्‍यांनी दिली.

यावेळी आयुे देविदास टेकाळे यांना निवेदनही देण्यात आले. त्याप्रसंगी मनविसेचे शहराध्यक्ष हर्षल परदेशी, गौरव गिते, शामक दादाभाई, भावेश गद्रे, आदित्य विरगावकर, राहुल बागुल, प्रशांत तनेजा, ऋषिकेश कानकाटे, गणेश जाधव, शुभम माळी आदींची उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या