मुंबई | Mumbai
भारतात देशांतर्गत क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. या हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेने झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी इंडिया ए विरुद्ध इंडिया बी, इंडिया सी विरुद्ध इंडिया डी या दोन्ही संघांमध्ये सामने पार पडले. दरम्यान नुकताच बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.
भारत अ संघाचा कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाशदीप यांची बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी संघात निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकणार नाहीत. प्रथम सिंग शुबमन गिलची जागा घेईल, अक्षय वाडकर केएल राहुलची जागा घेईल, एसके रशीद ध्रुव जुरेलची जागा घेईल, शम्स मुलानी कुलदीप यादवची जागा घेईल आणि आकिब खान भारत अ मध्ये आकाशदीपची जागा घेईल. मयंक अग्रवाल भारत अ संघाचा कर्णधार असेल.
भारत अ संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), रायन पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलाणी, आकिब खान .
भारत ब संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), सरफराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन, सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री