कोलकाता l Kolkata
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सौरव गांगुलीला काल रात्रीपासून सौरव गांगुलीच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्याने डॉक्टरांशी बातचित केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यावेळी उपचारानंतर ७ जानेवारीला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे होते. दरम्यान, सौरव गांगुली यांना उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं. यानंतर सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यानंतर गांगुली ला डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधून घरी परताना ‘मी डॉक्टरांचे आणि उपचारासाठी हॉस्पिटलचे आभार मानतो. मी ठिक आहे.’ अशी प्रतिक्रिया देखील दिली होती.