कोलकाता | Kolkata
टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारली असून आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
गांगुली यांना बुधवारी डिस्चार्ज मिळणार होता पण हॉस्पिटलमध्ये अजून एक दिवस थांबण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अखेर गुरुवारी, म्हणजे आजच त्याची घरवापसी झाली. गांगुली यांनी सर्व डॉक्टरांचे आपली काळजी घेतल्याबद्दल आभार मानले. “मी उपचारांसाठी रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानतो. मी पूर्णपणे ठीक आहे. आशा आहे की, मी लवकरच उड्डाण करायला तयार होइन,” गांगुलीने वुडलँड हॉस्पिटलबाहेर पत्रकारांना सांगितले.
गांगुलीची पाच दिवस रूग्णालयात राही घरवापसी झाली आणि आता त्यांची घरीच देखरेख केली जाईल. गांगुलीवर डॉक्टर सतत नजर ठेवतील आणि वेळोवेळी योग्य ते उपचार केल्या जातील असे रुग्णालयाने म्हटले आहे. मंगळवारी बुलेटिनमध्ये रुग्णालयाने म्हटले होते की, “नियमित रक्ताच्या टेस्टचा अहवाल समाधानकारक आहे, इकोकार्डियोग्राफीमध्ये डावी वेंट्रिक्युलर फंक्शन संरक्षित असल्याचे दिसून आले आहे, ज्याचा उत्सर्जन 56 टक्के आहे.” मंगळवारी वुडलँड्स हॉस्पिटलच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसू यांनी सांगितले की, माजी कर्णधाराचे दररोज घरीच परीक्षण केले जाईल. गांगुलीच्या प्रकृतीविषयी पत्रकारांना माहिती देताना डॉ. बसू म्हणाल्या की, 48 वर्षीय गांगुली पुढील प्रक्रियेसाठी किंवा वैद्यकीय हस्तक्षेपासाठी सुमारे 2-3 आठवड्यांनंतर तयार होतील.