Saturday, July 27, 2024
Homeनगरचप्पल दुरूस्तीचे पैसे मागितल्याने केली मारहाण

चप्पल दुरूस्तीचे पैसे मागितल्याने केली मारहाण

उंबरे |वार्ताहर| Umbare

चप्पल दुरूस्तीचे 20 रूपये मागीतल्याचा राग आल्याने विलास कांबळे यांना बेदम मारहाण केल्याची घटना 20 सप्टेंबर रोजी राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे घडली होती. तेव्हापासून विलास कांबळे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल त्यांचा मृत्यू झाला आहे. मारहाण करणार्‍या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अखेर त्या तरूणाचा मृतदेह आढळला

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील खडांबे नाक्या जवळ दिनांक 20 सप्टेंबर रोजी विलास नारायण कांबळे यांनी नेहमी प्रमाणेच चप्पल दुरूस्तीचे दुकान लावले होते. तेव्हा आरोपी भाऊसाहेब वाघमारे हा त्यांच्याकडे चप्पल दुरूस्तीसाठी गेला. चप्पल दुरुस्ती झाल्यानंतर विलास कांबळे यांनी त्यांच्या मजूरीचे 20 रूपये मागीतले. आरोपीला त्याचा राग आल्याने त्याने खिळे ठोकण्याचा लोखंडी बत्ता विलास कांबळे यांच्या डोक्यावर मारून बेदम मारहाण केली. तेव्हापासून विलास कांबळे यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

कोपरगावात दोन दुकानदारांची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

आज सकाळी चर्मकार विकास संघाच्या कार्यकर्ते सुरेखा देवरे, बाळासाहेब गोळेकर, विठ्ठल देवरे, कैलास वाघमारे, गणेश कानडे, किरण घनहाट, भिमराज तेलोरे, रविंद्र आहेर, बाळकृष्ण वाघ, प्रमोद वर्पे, बाळासाहेब वाघ, विशाल ठोकळ यांनी निवेदन देऊन नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तो पर्यंत अंत्यविधी करणार नाही. असा पवित्रा घेतल्याने काहीकाळ तवाण निर्माण झाला होता. अखेर गोरक्षनाथ विलास कांबळे याच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब किसन वाघमारे, राहणार मांजरसूंबा, ता. नगर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. घटनास्थळी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भेट दिली घटनेचा तपास पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहेत.

दुचाकीस्वारांच्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या