Friday, May 2, 2025
Homeधुळेएक लाख दिले नाही म्हणून मारहाण

एक लाख दिले नाही म्हणून मारहाण

धुळे । dhule। प्रतिनिधी

जुन्या महापालिकेत स्वंयभू कंपनीच्या (independent company) कचरा व्यवस्थापनाचे (waste management)काम पाहणार्‍या प्रोजक्ट मॅनेजरवर (project manager) शाईफेक करीत अंडे मारून मारहाण (beating) केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष (NCP’s Metropolitan District President)रणजीत भोसलेंसह चौघांवर शहर पोलिसात गुन्हा (crime)नोंद झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या शाखांसाठी 15 ते 20 लोखंडी बोर्डासाठी भोसले यांनी एका लाखाची मागणी केली होती. ती मान्य न केल्याच्या व्देष ठेवून चौघांनी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

याबाबत पुणे येथील स्वयंभू कंपनीचे प्राजेक्ट मॅनेजर अभिजीत नारायण फरतरे (वय 34 मुळ रा. पुसेगाव त खटाव जि.सातारा व ह.मु 3/साई व्हीला बंगला, शनी मंदिरा शेजारी, अग्रवाल नगर, धुळे) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार धुळे महापालिकेतर्फे शहरातील घनकचरा संकलन व वाहतुक व्यवस्थापनाचे शासकीय काम करीत असतांना, राष्ट्रवादी पक्षाचे रणजित राजे भोसले यांना त्यांच्या पक्षाचे बोर्ड बनविण्यासाठी मागितलेले 1 लाख रुपयांची मदत केली नाही. याचा द्वेष ठेवुन आज दि.21 रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास जुन्या महापालिका येथील तक्रार निवारण कक्षात जगन ताकटे यांनी फरतरे यांना बोलावून घेवून उमेश महाजन याने त्यांच्या अंगावर शाई फेकली.

तर रामेश्वर साबरे याने कानावर, मानेवर, डोक्यावर हाताबुक्कयांनी मारहाण करुन दुखापत केली. जिवे मारण्याचीही धमकी दिली. म्हणुन वरील चौघांवर भादंवि कलम 353, 384, 385, 332, 337, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासाहेब पाटील हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

0
अहिल्यानगर | प्रतिनिधी  अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले....