Saturday, May 4, 2024
Homeनगरघरासमोर गाडी लावण्यावरुन वकिलांना मारहाण

घरासमोर गाडी लावण्यावरुन वकिलांना मारहाण

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

घरासमोर मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून वकील पिता-पुत्रांना शिवीगाळ करून मारहाण झाल्याची घटना काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील विद्यानगर परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत ब्रह्मरूप सुरेश खिडके यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, मी व माझे वडील वकिली व्यवसाय करतो गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मी आमचे घराचे आवारात असताना तेजस विजय खर्डे याने आमचे घरासमोरील गेटला लावली. गाडी काढून घे असे सांगितल्याचा राग आल्याने त्याने मला शिवीगाळ केली. त्याने लगेच इतर मुलांना बोलावून घेतले.

त्यांनी गेट खोलून आत मध्ये प्रवेश केला. तेजस विजय खर्डे, निखिल शिंदे पूर्ण नाव माहीत नाही, चिव्या कळंबे पूर्ण नाव माहीत नाही (रा. शिवाजीनगर संगमनेर) यांनी मला मारहाण केली. मारहाणीत मला माझा शर्ट फाटला व मानेला मुका मार लागला आहे. त्यावेळी वडील सुरेश खिडके हे मध्ये आले असता त्यांना तिघांनी धरुन घराबाहेर ओढले मारहाणी दरम्यान खिशातील साडेचार हजार रुपये असे गहाळ झाले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या