Wednesday, November 20, 2024
Homeनगरचौघांच्या मारहाणीत व्यावसायिक जखमी

चौघांच्या मारहाणीत व्यावसायिक जखमी

घराच्या मालकीचा वाद || कोतवाली पोलिसात गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घराच्या मालकीच्या वादातून चौघांनी व्यावसायिकाला लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. लोकेश संजय जंजाळे (वय 29 रा. कबाडगल्ली, माळीवाड) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा श्रवण जंजाळे, कविता विलास बनकर, अंकीत विलास बनकर, विलास गंगाधर बनकर (सर्व रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक आहेत.

- Advertisement -

फिर्यादीने कविता बनकर हिच्या नावावर असलेले आंधळे चौरे कॉलनी येथील घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराच्या मालकीवरून फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात वाद आहेत. सोमवारी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या राहत्या घरी असताना संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून घराला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, पत्रे व कुलूपााची तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके व लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

जखमी फिर्यादी यांनी त्यांचा भाऊ कृष्णा जंजाळे यांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या