Tuesday, April 29, 2025
Homeनगरमारहाण झालेल्या घुलेवाडीच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

मारहाण झालेल्या घुलेवाडीच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

जागेच्या वादातून मारहाण झालेल्या वृद्धाचा उपचार सुरू असताना काल लोणी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. वृद्धाच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मयताच्या संतप्त नातेवाईकांनी केली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

तालुक्यातील घुलेवाडी येथील म्हसोबा नगर परिसरात राहणार्‍या पोपटराव दादाभाऊ निकम यांना दि. 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून काही जणांनी मारहाण केली होती. प्राथमिक उपचारानंतर त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. ते कोमात होते. उपचार सुरू असताना काल सकाळी त्यांचे निधन झाले. यामुळे मयताचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह घेवून थेट संगमनेर शहर पोलीस गाठले.

मारहाण करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातच ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक बाहेर गावाहून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. यानंतर रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढण्यात काही वेळानंतर पुन्हा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला. यावेळी अधिकार्‍यांनी चर्चा केली. अंत्यविधी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात या, असे अधिकार्‍यांनी सांगितले. लेखी आश्वासनानंतर मृतदेह घुलेवाडी येथे नेण्यात आला.

मयत पोपटराव निकम यांचा मुलगा विक्रम याने 20 फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. आपल्या नावे इंदिरा आवास घरकूल योजनेतील 2011-2012 ला संडास बाथरूम भेटलेले आहे. आम्ही घरी नसताना आम्हाला कोणतीही सूचना न देता सिताराम राऊत, राजू यादव खरात, सुनिल दगडु रोकडे, अविनाश कारभारी विधाटे, अनिल काटे, अनिकेत अशोक माघाडे, नवनाथ कारभारी विधाटे, राहुल शिवाजी मन्तोडे, आकाश सुरेश साळवे, राहुल संभाजी रोकडे, अनिकेत नवनाथ ठोंबरे, संतोष यादव खरात, मयुर अभिमन्यु राखपसरे, विठ्ठल दिलीप खरात, उज्वला नवनाथ ठोंबरे, अलका अशोक माघाडे, शोभा सुनिल रोकडे, नंदा संभाजी रोकडे, सुजाता विजय खरात यांनी पाडून त्याचा पुरावा नष्ट केला असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

सदर लोक हे दहशत निर्माण करीत असून त्यांना राजकीय पाठबळ आहे. ते आम्हाला खुप त्रास देतात. जागा हडप करण्यासाठी त्यांनी आपले वडील पोपटराव दादाभाऊ निकम यांना 4 फेब्रुवारी रोजी मारहाण केली होती. या लोकांपासुन आम्हाला धोका आहे. या लोकांनी आमचे संडास पाडुन आमची गैरसोय केली तसेच आमचा घराचा दरवाजा बंद करुन आमचा बाहेर वावरण्याचा वापर बंद केला. त्या जागेवर त्यांनी रातोरात भिंत बांधली.

संबंधित इसम आमच्या घराबाहेर दहशत निर्माण करतात. त्यामुळे आम्हाला घरातुन बाहेर पडणे मुश्किल झाले आहे तरी त्यांच्यावर लवकरात लवकर प्रतिबंधात्मक करावाई करावी, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली होती. या तक्रार अर्जामुळे निकम यांच्या मृत्यूचे गुड वाढले आहे. या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे घुलेवाडी येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...