Monday, May 27, 2024
Homeनगरदांडक्याने मारहाण करुन धमकी; गुन्हा दाखल

दांडक्याने मारहाण करुन धमकी; गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

घरावरील वादातून फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने घुसून लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना सोनई येथे घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेणुका प्रकाश घुले यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, तुम्ही घर सोडून गेला नाही तर तुला व तुझ्या पतीला दोघांना जिवंत सोडणार नाही असा बाबासाहेब बन्सी घुले रा. दरंदले गल्ली सोनई यांनी दम दिला.

- Advertisement -

या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 105/2023 भादवि कलम 324, 323, 452, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली बाबासाहेब अकोलकर पुढील तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या