Sunday, April 27, 2025
Homeनगरपोटात मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू; तिघांवर गुन्हा दाखल

पोटात मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू; तिघांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर, प्रतिनिधी| Newasa

मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाच्या पोटात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडका येथे घडली असून याबाबत मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भाऊसाहेब परभत नेमाणे, मूळ रा. शिरेसायगाव, ता. गंगापूर हल्ली रा. खडकाफाटा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 31 जुलै रोजी मुलगा शरद नेमाणे हा सायंकाळी साडेपाच वाजता घरासमोर उलट्या करत असताना दिसला.

- Advertisement -

त्याला त्याबाबत विचारले असता सकाळी साडेअकरा वाजता अमोल खेमनर याच्या शेतात गेलो असता मागील मारहाणीच्या कारणावरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर व किसन खेमनर यांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्याने पोटात मारहाण केली असल्याचे सांगितले. मुलगा शरद यास पोटदुखी व उलट्याचा त्रास होत असल्याने माझी पत्नी सुशीलाबाई ही मुलगा शरद यास नेवाशातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मुलगा शरद याचा त्रास वाढतच गेला त्यास सरकारी रुग्णालयात दाखल केले असता अडीच वाजता त्यास मयत घोषित केले. या फिर्यादीवरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर व किसन खेमनर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 351(2) व 352 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : दोन महिलांना पिकअपची धडक, एक जागीच ठार तर...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एक भीषण अपघात घडला. दोन महिलांना भरधाव पिकअपने धडक दिली, ज्यात एक महिला जागीच ठार झाली, तर...