Saturday, May 4, 2024
Homeनगरमारहाणीत केडगावच्या युवकाचा मृत्यू

मारहाणीत केडगावच्या युवकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मारहाणीत केडगाव येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी ही मारहाण केली असल्याचा आरोप मयत युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित पोलिसावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीसाठी मयताच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी रेल्वे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. विशाल नागनाथ धेंडे वय 35 असे मारहानीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

रेल्वे स्टेशन परिसरात राहणार्‍या विशाल धेंडे या युवकास रेल्वे पोलिसांनी 31 जुलै आणि 4 ऑगस्टला जबर मारहाण केली होती. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचा संशय कुटुंबियांना आहे. दरम्यान औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मयताचे पीएम करण्यात आले असून पीएम रिपोर्टमध्ये त्याचा गंभीर मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे नमूद आहे. त्यामुळे मारहाण करणार्‍या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

दरम्यान संबंधित पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. मयाताच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. यावेळी संजय कांबळे, प्रतिक बारसे, निलेश बांगरे, अजय साळवे, संजय जगताप, बाळासाहेब कांबळे, संजय बहीलुमे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या