Friday, February 6, 2026
Homeक्राईमबीडच्या टोळीकडून नोकरदारावर हनीट्रॅप

बीडच्या टोळीकडून नोकरदारावर हनीट्रॅप

एमआयडीसीतील घटना || तरुणीसह चौघांना अटक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तरूणीने तिच्या बीड जिल्ह्यातील मित्रांच्या मदतीने अहिल्यानगरमधील एका नोकरदाराला ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात अडकविल्याची घटना एमआयडीसी हद्दीत घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘हनीट्रॅप’ करणार्‍या बीडच्या टोळीला अटक केली आहे. तरूणीसह चौघांचा यामध्ये समावेश आहे. मयुर मधुकर ढोले (वय 27, रा. सुयोग अपार्टमेंट, शिवाजीनगर, बीड), अभिजीत शंकर गलधर (वय 27, रा. सिध्देश्वर, एमआयडीसी, बीड), नितीन स्वामी डांगरे (वय 26, रा. बुरूडगल्ली, हिरालाल चौक, बीड), प्रियांका पांडुरंग ढलपे (रा. बीड) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

- Advertisement -

फिर्यादी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात राहत असून खासगी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांची प्रियांका सोबत ओळख झाली होती. तिने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान, ते दोघे शुक्रवारी (24 जानेवारी) सायंकाळी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या पटांगणात भेटले. त्याच वेळी प्रियांकाचे साथीदार तेथे आले व त्यांनी मारहाण केली. जबरदस्तीने फिर्यादीच्या फोन पे खात्यातून 1 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच दोन तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅमची अंगठी, कागदपत्रे असा एक लाख 75 हजारांचा ऐवज लुटला. त्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

YouTube video player

दरम्यान, याप्रकरणी फिर्यादीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, महादेव भांड यांच्या पथकाने तपास करून संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यांनी प्रियांकाच्या मदतीने फिर्यादीला लुटल्याची कबूली दिली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...