Saturday, July 13, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation: शिंदे गटापाठोपाठ ठाकरे गटाला धक्का; मराठा आरक्षणासाठी ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Maratha Reservation: शिंदे गटापाठोपाठ ठाकरे गटाला धक्का; मराठा आरक्षणासाठी ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बीड | Beed

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच, हदगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर, दुसरीकडे बीडमध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) देखील मोठा धक्का बसला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाच्या तालुकाप्रमुखासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे (36 Party Workers Resigns For Maratha Reservation) दिले आहेत.

केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते. त्यानंतर थोरात यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाप्रमुख शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचा समावेश आहे.

आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी देखील आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतली असून अनेक ठिकाणी राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहेत.

२९ ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊन युवा सेना, शिवसेना, वाहतुक सेना पदाधिकाऱ्यांनी आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी अन्नपाणी त्यागून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्याचे एकमताने ठरले. तसेच युवासेना तालुकाप्रमुख, वाहतुक सेना तालुकाप्रमुख, युवासेना विधानसभा प्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना व युवासेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख, शाखाप्रमुख असे एकूण ३६ पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृह केज येथील बैठकीत पक्षाच्या पदाचे आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या