आपण जर प्रथमच योगा करत आहात तर काळजी करू नका.हे काही सोपे आसन करून आपण योगासनाला सुरू करू शकता.जेणेकरून आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील.हे आसन करायला खूप सोपे आहेत,जे कोणीही सहजपणे करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.कोणते आहेत ते आसन.
बालासन -जर आपण योगासन करणे सुरूच केले आहे तर हे आसन करा.हे केल्याने आपला मेंदू आणि मन शांत राहील.आणि हे करायला खूप सोपं आहे.हे करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसा.नंतर आपलं डोकं जमिनीला स्पर्श करा. दोन्ही हाताला जमिनीवर ठेवा.छातीने मांडीवर दाब द्या.
नौकासन-हे आसन करायला काही अवघड नाही.हे केल्याने शरीराला व्यवस्थित आकारात आणू शकतो. अनेक रोगापासून मुक्ती देखील मिळते.हे करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा.दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात पायाजवळ ठेवा. हाताला पायाकडे ओढा.पाय आणि छाती वर उचला.आपले डोळे,हाताचे बोट,आणि पायाचे बोट सरळ असावे.पोटाचे स्नायू आकुंचन झाल्यामुळे नाभीत होणारा ताण अनुभवा.
सर्वांगासन -हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे शरीरातील सर्व अवयवांसाठी फायदेशीर आहे.कारण यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.याचा हळू-हळू सराव केल्याने हे आसन करणे सहज सोपे होते.सुरुवातीस हे आपल्या क्षमतेनुसार करावे.हे आसन केल्याने थॉयराइड ग्रंथी नियंत्रित होतात आणि शरीरातील पचन पासून पाठीच्या कणा पर्यंतच्या क्रिया सुरळीत होतात.