Thursday, April 10, 2025
HomeनगरShirdi : मयत वाघमारे यांचा मृतदेह शिर्डी पोलीस ठाण्यात आणून नातेवाईकांचे आंदोलन

Shirdi : मयत वाघमारे यांचा मृतदेह शिर्डी पोलीस ठाण्यात आणून नातेवाईकांचे आंदोलन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

विसापूर येथील भिक्षेकरी गृहात मयत झालेले शिर्डी जवळील पिंपळस येथील सारंगधर वाघमारे व शिर्डीतील इसार शेख यांच्या नातेवाईकांनी या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मयत वाघमारे यांचा मृतदेह शिर्डी पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन केले.
इसार शेख व सारंगधर वाघमारे यांच्यासह पन्नासावर व्यक्तींना गेल्या आठवड्यात शिर्डीत भिक्षेकरी म्हणून पकडण्यात आले होते. येथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर राहाता न्यायालयाने पुरुष भिक्षेकर्‍यांची रवानगी विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी गृहात केली होती. तेथे काही भिक्षेकर्‍यांची प्रकृती खालवली नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे चार जणांचा मृत्यू झाला. त्यात सारंगधर वाघमारे व इसार शेख यांचेही दुर्दैवी निधन झाले.

- Advertisement -

बुधवारी शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पार्थिवासह शिर्डी पोलीस ठाणे गाठले. हे भिक्षेकरी नसतांना त्यांना पोलीस, नगरपालिका व साईसंस्थानने पकडले. कोर्टाने त्यांना तिकडे विसापूरला पाठवले. तिथे त्यांना बांधून ठेवण्यात आले, अन्न पाणीही देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करत याला संबधित यंत्रणा जबाबदार आहेत, याप्रकरणी फिर्याद दाखल करा अशी नातेवाईकांची मागणी केली. आमचा बाप जिवंत नेला, जिवंत आम्हाला परत द्या अशी आर्त भावना वाघमारे यांच्या मुलगा, मुली व नातेवाईकांनी व्यक्त केली. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हंबरडा फोडला. त्यांच्या बरोबर बौद्ध भिक्खु पण ठाण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी यासंदर्भात पंचनामा व शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचे फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे उपस्थित होते.

रिपाइंची जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, नाशिकचे अँड राहुल तूपलोंढे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी नातेवाईकांच्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या. शिर्डी पोलीस ठाण्यात बुधवारी मयत शेख व वाघमारे यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत दोषींंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यावेळी पोलीस ठाण्यात समोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sangamner : संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढविण्याचा विरोधकांचा निर्णय

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले...